महाकुंभमेळ्यात ५० कोटींपेक्षा अधिक भाविकांचे स्नान

लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाले असून त्या बदल्यात ३ लाख कोटी रुपयांचा फायदा होत आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.



सध्या सरकारी आकडेवारीनुसार, महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणा-या भाविकांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत, असे म्हटले जात आहे.



दरम्यान, महाकुंभमेळा संपण्यास अजून बराच वेळ आहे. महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान देखील बाकी आहे, जे महाशिवरात्रीला होणार आहे. त्यामुळे येथे येणा-या भाविकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ब्राझीलच्या रिओ कार्निव्हल किंवा जर्मनीच्या ऑक्टोबर फेस्टमध्ये जमणारी मोठी गर्दी देखील प्रयागराजमधील आयोजित महाकुंभमेळ्याच्या तुलनेत काहीच नाही. शुक्रवारी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात आणखी एक नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. महाकुंभदरम्यान ३०० स्वच्छता कर्मचा-यांनी गंगा आणि संगम नदीवरील राम घाट, गंगेश्वर घाट आणि भारद्वाज घाट या तीन घाटांची अर्धा तास सतत स्वच्छता करून एक नवा विक्रम केला आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स टीमचे ज्युरी सदस्य प्रवीण पटेल यांच्या देखरेखीखाली हा नवा विक्रम करण्यात आला आहे. महाकुंभमेळ्यात घडलेला हा अनोखा विक्रम याआधी जगात कोणीही केलेला नाही.
Comments
Add Comment

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या