Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीमहाकुंभमेळ्यात ५० कोटींपेक्षा अधिक भाविकांचे स्नान

महाकुंभमेळ्यात ५० कोटींपेक्षा अधिक भाविकांचे स्नान

लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाले असून त्या बदल्यात ३ लाख कोटी रुपयांचा फायदा होत आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

मेट्रोच्या बीकेसी – कुलाबा मार्गाचे ९३ टक्के काम पूर्ण

सध्या सरकारी आकडेवारीनुसार, महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणा-या भाविकांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत, असे म्हटले जात आहे.

CIDCO Lottery : सिडकोच्या घरांसाठी आज सोडत

दरम्यान, महाकुंभमेळा संपण्यास अजून बराच वेळ आहे. महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान देखील बाकी आहे, जे महाशिवरात्रीला होणार आहे. त्यामुळे येथे येणा-या भाविकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ब्राझीलच्या रिओ कार्निव्हल किंवा जर्मनीच्या ऑक्टोबर फेस्टमध्ये जमणारी मोठी गर्दी देखील प्रयागराजमधील आयोजित महाकुंभमेळ्याच्या तुलनेत काहीच नाही. शुक्रवारी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात आणखी एक नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. महाकुंभदरम्यान ३०० स्वच्छता कर्मचा-यांनी गंगा आणि संगम नदीवरील राम घाट, गंगेश्वर घाट आणि भारद्वाज घाट या तीन घाटांची अर्धा तास सतत स्वच्छता करून एक नवा विक्रम केला आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स टीमचे ज्युरी सदस्य प्रवीण पटेल यांच्या देखरेखीखाली हा नवा विक्रम करण्यात आला आहे. महाकुंभमेळ्यात घडलेला हा अनोखा विक्रम याआधी जगात कोणीही केलेला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -