Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीमेट्रोच्या बीकेसी - कुलाबा मार्गाचे ९३ टक्के काम पूर्ण

मेट्रोच्या बीकेसी – कुलाबा मार्गाचे ९३ टक्के काम पूर्ण

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पातील बीकेसी – कुलाबा टप्प्याचे ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ अखेर प्रवाशांसाठी हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी मेट्रोच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगाने सुरू आहे. यामुळे बीकेसी – कुलाबा टप्प्यातील मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

अटल सेतू शनिवारी रात्री ११ पासून रविवारी दुपारी १ पर्यंत बंद राहणार

‘फेज 2ए’ च्या बांधकामासोबतच त्याचं स्ट्रक्चर आणि सिस्टमॅटिक फंक्शन शेवटच्या टप्प्यात आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत आणण्यासाठी आवश्यक अंतिम मंजुरी दिली जाईल. बीकेसी – कुलाबा मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली तर मुंबईतील बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Local Update : नेरुळ स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर सेवा कोलमडली

मुंबई मेट्रो अॅक्वालाईनची एकूण लांबी ३३.५ किमी आहे. या मार्गावर एकूण २७ स्थानकं आहेत.हा मार्ग कफ परेडला बीकेसीशी तर आरेला जेव्हीएलआरशी जोडतो. याआधी पंतप्रधान मोदींनी याच मार्गावरील १२.६९ किमी लांबीच्या फेज १ चे उद्घाटन केले आहे. हे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी ऑक्टोबर २०२४ मध्ये केले होते. आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो गेल्याने बीकेसी ते वरळी दरम्यान मेट्रोची कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. भूमिगत मेट्रोचे तिकीट एलिवेटेड मेट्रोच्या तुलनेत जास्त आहे. याच कारणामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो भाड्याच्या दरात पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -