Nitesh Rane : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ

  102

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांची निवड


मुंबई  : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉमध्ये या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मित्तल टॉवर येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामध्ये या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहित आणि रोहित या दोन लहामुलांच्या हस्तेही काही लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली. यावेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्यउद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या लकी ड्रॉमध्ये प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील १७ विविध योजनांच्या एकूण २३४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. एकूण ८९ कोटी ११ लाख रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.



गोड्या पाण्यातील मत्स्य बीज पालन या महिलागटासाठी एकूण ६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. २५ लाख रुपये प्रती लाभार्थी या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दिला जाणार आहे. मत्स्य तलाव जैविक प्रकल्प या ५० लक्ष रुपयांच्या प्रकल्पाचा लाभ अनुसुचित जमातीच्या ६ लाभार्थ्यांना आणि ३२ महिला लाभार्थ्यींची निवड करण्यात आली. या योजनेमध्ये प्रत्येकी २५ लक्ष या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मध्यम मत्स्य जैविक प्रकल्पासाठी २७ लाभार्थी निवड करण्यात आली.


प्रत्येकी २५ लक्ष रुपये याप्रमाणे एकूण ६ कोटी ७५ लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनासाठी २२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेत प्रत्येकी ५४ लक्ष या प्रमाणे एकूण ११ कोटी ८८ लक्ष रुपयांचा लाभ दिला जातो. १० टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना उभारणे या योजनेसाठी ५ महिला लाभार्थींची निवड करण्यात आली. या योजनेत प्रती लाभार्थी ४० लक्ष या प्रमाणे एकूण २ कोटींचा लाभ दिला जातो.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई