Arvind Kejriwal : केजरीवालांच्या बंगल्याच्या खर्चाची चौकशी करा

केंद्रीय दक्षता आयोगाने दिले केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश


नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ६ फ्लॅग स्टाफ रोड येथील शीशमहल या सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकाळात हा खर्च करण्यात आला होता. आता या खर्चाची सखोल चौकशी करण्यात यावी असे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला (सीपीडब्ल्यूडी) दिले आहेत.


दिल्‍लीच्या मुख्‍यमंत्र्यांचे निवासस्‍थान शीशमहल हे ४० हजार चौरस यार्डांहून (८ एकर) अधिक जागेवर आहे. या बंगल्‍याच्‍या नूतनीकरणाचे आदेश केजरीवालांनी दिले होते.


मात्र नूतनीकरण करताना बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्‍याची तक्रार १४ ऑक्टोबर २०२४ रोजी विजेंदर गुप्ता यांनी सीव्हीसीकडे दाखल केली होती.



विजेंदर गुप्ता यांनी आरोप केला होता की, केजरीवाल यांनी ४० हजार चौरस यार्ड (८ एकर) मध्ये पसरलेली ही भव्य इमारत बांधण्यासाठी इमारत नियमांचे उल्लंघन केले. राजपूर रोडवरील प्लॉट क्रमांक ४५ आणि ४७ (पूर्वीचे टाइप-व्ही फ्लॅट्स ज्यात वरिष्ठ अधिकारी आणि न्यायाधीश राहत होते) आणि दोन बंगले (८-अ आणि ८-ब, फ्लॅग स्टाफ रोड) यासह सरकारी मालमत्ता पाडून त्‍याचे नवीन घरांमध्ये विलीन करण्यात आल्या.


यामध्‍ये ग्राउंड कव्हरेज आणि फ्लोअर एरिया रेशो (एफएआर) नियमांचे उल्लंघन करण्‍यात आले. तसेच योग्य लेआउट प्लॅनचा अभाव आहे.


सीव्हीसीने ५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुप्ता यांच्या तक्रारीची दखल घेतली आणि आरोपांचे गांभीर्य मान्य केले. त्यानंतर, ५ डिसेंबर रोजी, सीपीडब्ल्यूडीच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी (सीव्हीओ) विजेंद्र गुप्ता यांच्या तक्रारीवर आधारित तथ्यात्मक अहवाल सीव्हीसीला सादर केला होता.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१