नवी मुंबई : रेल्वेप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेलहून ठाण्याकडे येणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याचं समजत आहे. यामुळे कामगार वर्गाला याचा फटका बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास नेरूळमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्या रुळावरच थांबल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. परिणामी प्रवाशांची रुळावरूनच पायपीट सुरु झाली आहे. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी पोहचले असून दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र या समस्येमुळे नेरुळ स्थानकावर गर्दी पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला याचा फटका बसणार आहे.