Prajakta Mali : प्राजक्ता होणार चुलबुली! चाहत्यांना दिसणार हटके अंदाजात

  129

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात (Entertainment News) सध्या एकामागोमाग एक नव्या चित्रपटाची घोषणा होत आहेत. त्यामुळे सिनेप्रेमींसह चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध झाली आहे. अशातच आता प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन केलेला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (Chiki Chiki Booboom Boom) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, वनिता खरात, प्रसाद खांडेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका प्राजक्ता माळी (Prajakta Mali) देखील या चित्रपटात आगळीवेगळी भूमिका करणार आहे.



अभिनय, नृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात ती रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. रावी ही अतिशय चुलबुली आणि उत्साही आहे पण त्याचवेळी ती गोंधळलेली सुद्धा आहे. विनोदाचा वेगळा बाज असलेली ही चॅलेंजिंग भूमिका प्राजक्ता साकारत आहे.


धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट उडवत २८ फेब्रुवारीला 'चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. (Prajakta Mali)

Comments
Add Comment

बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात

Shefali Jariwala Death: ज्याचा विचार करत होती, त्याच्यासारखेच मरण आलं! शेफालीची 'ती' पोस्ट व्हायरल

EX बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाबाबत शेफालीची शेवटची पोस्ट व्हायरल  'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे

विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?

  दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेच्या

रश्मिकाच्या या लूकने प्रेक्षक घाबरले; श्रीवल्लीचा उग्र अवतार पाहिला का ?

अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच निरनिराळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येऊन त्यांची मन जिंकते. नॅशनल क्रश असणारी

सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ पुन्हा रंगमंचावर

मुंबई :'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात रंगमंचावर येणार आहे.या