काँक्रिटीकरणाची कामे सुरू; रस्त्यावरच वाहने उभी

रस्ते कामाची गुणवत्ता, दर्जा कसा राखला जाणार


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून काँक्रिटीकरण कामांचा दर्जा, गुणवत्ता यांच्याशी कदापि तडजोड खपवून घेतली जाणार नाही, याची दक्षता बाळगा, असे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. परंतु एका बाजुला रस्त्यांची कामे सुरु असलेल्या जागेवरच अनधिकृत वाहने उभी केली जातात, तिथे रस्ते बांधकामाचा दर्जा कसा गुणवत्ता पूर्वक राखला जाणार असा सवाल उपस्थित होत आहे.


मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्पा १ मधील ७५ टक्के कामे आणि टप्पा २ मधील ५० टक्के कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार रस्ते कामाला वेग आला आहे. मात्र, सांताक्रूझ पूर्व येथील हयात हॉटेलपासून हनुमान मंदिर ते वाकोला वॉटर वर्क्स यार्डपर्यंत असलेल्या गावदेवी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.



या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम काही स्वरुपात झाले असून शेवटच्या टप्प्यात हे काम आहे. परंतु या रस्त्याचे अर्धवट काम झालेले असतानाच सुरु असलेल्या रस्त्यांवरच आसपासच्या रहिवाशांची वाहने, रिक्षा तसेच खासगी ओलाची वाहने उभी केली जात आहेत. या रस्त्यावरच आधीपासून दाटीवाटीने रिक्षा आणि इतर वाहने उभी केली जात असल्याने याठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असते. परंतु आता सिमेंटीकरणाचे काम सुरु असतानाच त्यावर वाहने उभी करून ठेवल्याने रस्ते कामांत मोठ्या अडचणी येत आहे. अशाप्रकारे वाहने काम सुरु असलेल्या रस्त्यांवर उभी केली जात असल्याने या रस्ते कामाची गुणवत्ता आणि दर्जा कसा राखला जाणार असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

Income Tax Bhavan Fire : ब्रेकिंग न्यूज! चर्चगेट स्टेशनजवळ आयकर भवनला आग, परिसरात धुराचे लोट

- अग्निशमन दलाच्या८ गाड्या घटनास्थळी दाखल मुंबई : मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चर्चगेट

Metro Slab Collapse : मुंबईत मोठी दुर्घटना टळली! मिरा रोडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; स्कूल व्हॅन थोडक्यात बचावली

मीरा रोड :  मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रोचे काम वेगाने सुरू असताना सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा

SIR Voter List: पश्चिम बंगाल, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही विरोधकांचे 'एसआयआर'कडे दुर्लक्ष

- भाजपकडून ९४ टक्के मतदान केंद्रांवर बीएलए नियुक्त; मनसे, शरद पवार गट, उबाठामध्ये उदासीनता मुंबई : पश्चिम बंगाल

Kirit Somaiya : मुंबईतील 'एसआयआर' मोहिमेत मृत मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेत तफावत

- किरीट सोमय्यांचा आरोप; निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विशेष संक्षिप्त

Ashwini Bhide : सर्व परवानाधारक फेरीवाले वापरत असलेल्या क्षेत्रफळांची पाहणी करा, अतिक्रमित असेल तर कारवाई करा

- महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांनी परवाना

Science Centre Metro Station : सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी कोस्टल रोड प्रोमेनेडपर्यंत भुयारी पादचारी मार्ग

टीओडी अंतर्गत केला जाणार विकास, प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार खर्च एमएमआरसीएलच्या