Tuesday, May 13, 2025

विदेशताज्या घडामोडी

बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले झाल्याचे 'युनो'च्या अहवालात उघड

बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले  झाल्याचे 'युनो'च्या अहवालात उघड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत तत्कालीन शेख हसीना सरकारविरोधात तीव्र निदर्शने झाली होती. हे आंदोलन चिरडण्यासाठी शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील राजवट निदर्शकांवर पद्धतशीर हल्ले करण्यात आले. या अत्याचाराला ‘मानवतेविरुद्धचे गुन्हे’ असे संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) मानवाधिकार कार्यालयाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.



याच अहवालात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराकडे दुर्लक्ष केले. केवळ ‘अतिशयोक्त प्रचार’ म्हणून वारंवार हिंदूंवर हल्लेच झाले नाहीत, असे सांगितले, असे नमूद करण्यात आले असल्याने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पर्दाफाश झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या तथ्य-शोधक अहवालात हिंदूंच्या प्रार्थनास्थळांवर झालेल्या हल्ल्यांसह हिंसक जमावाच्या हल्ल्यांचे पुरावे देऊन दावे खोडून काढल्याचे आहेत.



५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशातील हिंसक निदर्शनांमुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन केले. देशाच्या १७ कोटी लोकसंख्येपैकी ८% हिंदू असलेल्या हिंदूंना प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. त्यांची घरे, व्यवसाय व धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली. शेख हसीना यांनी देशातून पलायन केल्यानंतर अराजकतेत अल्पसंख्याक हिंदूंवर २०० हून अधिक हल्ले झाले.
Comments
Add Comment