धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण; अपात्र झोपडीधारकांचे काय होणार?

मुंबई : धारावीतील रहिवाशांना चांगले घर मिळणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकाराला येत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बुधवारी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. या धारावीतील तब्बल ५० हजारहून अधिक घरांचे प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. धारावीत अनेक आव्हानांना सामोरे जात या मोठ्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र टीम कठोर परिश्रम घेत आहे. कारण, धारावीतील सर्वेक्षणात लोकांची घरे आणि त्यांच्या भावना जुळलेल्या आहेत. सर्व धारावीकरांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी अलीकडेच केले होते.


मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. “पुनःसर्वेक्षणामुळे होणाऱ्या विलंबाचा तूर्तास आम्ही विचारही करू शकत नाही. कारण, आम्ही एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना करत आहोत. प्रकल्प वेगाने पू्र्ण होण्यासाठी रहिवाशांचे पूर्ण सहकार्य आवश्यक आहे. ज्यांनी अद्याप सर्वेक्षणात भाग घेतलेला नाही, त्यांनी आपल्या कागदपत्रांसह स्वत: हून पुढे येऊन सहकार्य करावे,” असे DRP चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी काही म्हटले होते.


सर्वेक्षणाच्या नव्या आकडेवारीनुसार, ८५ हजार झोपड्यांची क्रमवार नोंदणी पूर्ण झालेली आहे. ५० हजारहून अधिक झोपड्यांचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. “धारावीतील गुंतागुंत, अंतर्गत भागात फिरताना येणारी आव्हाने, तसेच खूप मोठी लोकसंख्या पाहाता आशियातल्या या सर्वांत मोठ्या झोपडीपट्टीच्या नकाशाचे काम पूर्ण करताना ५० हजार घरांचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण होणे ही लक्षणीय बाब आहे, असे धारावी पुनर्विकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या