इंफाळ: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने राष्ट्रपती राजवटीसंबंधी अधिसूचना जारी केली आहे. एम बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा होती. यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
एन बिरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा यावेळेस आला होता जेव्हा विधानसभेत काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव येणार होता. राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी २०२५ला राजीनामा दिला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि अर्धसैनिक बलाच्या अधिकाऱ्यांनी आज राजभवनात बैठक घेतली होती. या दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांना सीआरपीएफ तैनातीबाबत माहिती दिली.
हिंसाचारादरम्यान बिरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा
दरम्यान, राज्यपाल अजय भल्ला यांनी रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर सोमवारपासून सुरू होणारे बजेट अधिवेशन निलंबित केले. बिरेन सिंह यांनी आपल्या सरकारचा अविश्वास प्रस्ताव आणि महत्त्वपूर्ण फ्लोर टेस्टचा सामना करण्याच्या एक दिवस आधी पद सोडले. मणिपूर २०२३मध्ये जातीय हिंसाचार भडकल्यानंतर साधारण २ वर्षांनी आणि विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावादरम्यान त्यांचा राजीनामा आला.