लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, मुख्यमंत्र्यांची आश्वासनपर ग्वाही

लाडकी बहीण अपात्र योजनेसाठी निराधार योजनेतून मदत देणार


मुंबई (प्रतिनिधी) : "लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे", असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच" ही योजना कधीही बंद पडणार नाही। अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी ladkiयेथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रम या संस्थाने "जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी" या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली.


मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. "भांडे घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत कुटुंब कस चालवायचं, याचा प्रश्न होता. पण 'लाडकी बहीण' योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला," असे म्हणताना एक वृद्ध महिलेचा गळा दाटून आला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत "लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता विचार करतोय, असे आश्वासन दिले. या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती,तर जीवनभर लक्षात राहणारा असा अनुभव होता. आम्ही कधी विमान पाहिले नव्हते, त्यातून प्रवासही केला. गेल्या दोन दिवसांत आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली," असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.



या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, "सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत." यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत "शासन पातळीवर या मागणीचा विचार करू, असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला 'लाडकी बहीण' योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना 'निराधार योजना' अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या भेटीचे आयोजन "रसिकाश्रय" संस्थेने केले होते. "या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करम्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी