पंचांग
आज मिती माघ कृष्ण प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र मघा. योग शोभन ७.३० पर्यंत नंतर अतिगंड. चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २४ माघ शके १९४६. गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०८, मुंबईचा चंद्रोदय ०७.२३, मुंबईचा सूर्यास्त ०६.३७, मुंबईचा चंद्रास्त ०७.३७, राहू काळ ०२.१९ ते ०३.४५. गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा, खंडोबा महाराज यात्रा, मरळ खु!!, विष्णूबुवा जोग महाराज. पुण्यतिथी – आळंदी देवाची, शुभ दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : जवळच्या तसेच दूर अंतरचे प्रवास होतील. प्रवास कार्यसाधक होतील.
|
 |
वृषभ : जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक लाभ मिळवून देतील.
|
 |
मिथुन : व्यवसाय-धंद्यात नवीन करार होऊ शकतात.
|
 |
कर्क : काही संवेदनशील घटना घटित होण्याची शक्यता.
|
 |
सिंह : नशीब साथ देईल. घेतलेले निर्णय अचूक व बरोबर ठरतील.
|
 |
कन्या : कुटुंबामध्ये आनंदी वार्ता मिळाल्यामुळे वातावरण बदलेल.
|
 |
तूळ : वादविवाद निर्माण होऊ शकतात. त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा.
|
 |
वृश्चिक : सार्वजनिक जीवनातून शत्रू डोके वर काढू शकतात. सावध राहा.
|
 |
धनू : तरुण-तरुणींचा नोकरीविषयक प्रश्न सुटेल.
|
 |
मकर : कायदे-कानून व शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरेल. प्रवासाचे योग.
|
 |
कुंभ : आपल्या कार्यक्षेत्रात नेत्रदीपक यश मिळेल.
|
 |
मीन : कुटुंब परिवारात समाधानी वातावरण राहून जीवनातील प्रश्न सुटतील
|