

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेला आगरकर मार्गावर एका सहकारी बँकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक घोटाळ्याची तयारी सुरू होती. पण सावध असलेल्या यंत्रणेने ...
या व्यतिरिक्त सद्यस्थितीत पालघर येथील १६ वर्षीय मुलगी गुइलेन-बॅरे सिंड्रोम बाधेमुळे बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर रूग्णालयात दाखल आहे. या रुग्ण मुलीला ताप आला होता. योग्य उपचारांमुळे रूग्ण मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) उपचारांसाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. नागरिकांनी गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरुन जाऊ नये. मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या महानगरपालिका रुग्णालयास त्वरित संपर्क करावा, असे आवाहनदेखील महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुंबई : पंजाब अँड नॅशनल बँक अर्थात पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी याला कॅन्सर झाला असून तो बेल्जियममध्ये उपचार घेत आहे, अशी माहिती ...
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची माहिती:
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार (Auto immune) स्वरुपाचा विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्थांवर (peripheralnervous system) हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो.

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे ८५ व्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. आचार्य सत्येंद्र दास यांना ...
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्यरोग नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.

मुंबई : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक'चे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम ...
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच GBS ची इतर अनेक कारणे असतात
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग वर्षभर आढळतो. साधारणपणे १ लाख लोकांमध्ये एकजण या रोगाने ग्रस्त असतो. त्यामुळे, मुंबईतील मोठी रूग्णालये / वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला 'जीबीएस' चे काही रुग्ण उपचारासाठी येतात.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे :
* अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
* अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा
* जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप
नागरिकांनी घ्यावयाची काळजी :
* पिण्याचे पाणी उकळून प्यावे
* स्वच्छ व ताजे अन्न खावे
* शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये
* वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
* हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.