मुंबई : पंजाब अँड नॅशनल बँक अर्थात पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी याला कॅन्सर झाला असून तो बेल्जियममध्ये उपचार घेत आहे, अशी माहिती त्याच्या वकिलाने विशेष न्यायालयाला दिली. हिरे व्यापारात गुंतलेला मेहुल चोक्सी पीएनबीकडून उचललेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज फेडण्याऐवजी फरार झाला आहे. मेहुल विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. या कारवाई दरम्यान मेहुल चोक्सीच्या वकिलाने विशेष न्यायालयाला त्याच्या तब्येतीबाबत माहिती दिली.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या मिसिंग लिंकचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार
मेहुल चोक्सी याला आर्थिक गुन्ह्यातील फरार आरोपी जाहीर करावे, अशी मागणी सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate or ED) आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित मुंबईतील विशेष न्यायालयाकडे केली आहे. ईडीच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मेहुल चोक्सी बेल्जियममध्ये वैद्यकीय उपचार घेत असल्याचे त्याच्या वकिलाने विशेष न्यायालयाला सांगितले.
Mumbai Breaking News : मुंबईला GBSचा विळखा; नायर रुग्णालयातील रुग्णाचा घेतला बळी
मेहुल चोक्सी याला फरार आर्थिक गुन्हेगार असे जाहीर केल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार ईडीला मिळतील. पण चोक्सीच्या वकिलाने मेहुल आजारी असल्याचे सांगून जप्तीची कारवाई टाळण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पीएनबीचे १३ हजार ४०० कोटी रुपये बुडवून मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे दोघे देशाबाहेर पळून गेले आहेत. या प्रकरणी मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी विरोधात सीबीआय आणि ईडी या दोन्ही केंद्रीय तपास संस्थांनी गुन्हे नोंदवले आहेत. वारंवार समन्स बजावूनही मेहुल चोक्सी ईडीच्या चौकशीला हजर झालेला नाही. यामुळे ईडीने मेहुल चोक्सीला फरार जाहीर करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. हा अर्ज २०१८ मध्येच करण्यात आला आहे. या संदर्भातल्या कारवाई वेळी चोक्सीच्या वकिलाने विशेष न्यायालयाला मेहुलच्या तब्येतीबाबत माहिती दिली.