Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचे निधन

राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचे निधन

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे ८५ व्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. आचार्य सत्येंद्र दास यांना ब्रेन हॅमेरज ३ फेब्रुवारी रोजी झाले. तब्येत बिघडल्याचे लक्षात येताच त्यांना लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (एसजीपीजीआयएमएस) या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांनी बुधवार १२ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. आचार्य सत्येंद्र दास यांचे अंत्यसंस्कार अयोध्येत केले जातील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्स पोस्ट करुन शोक व्यक्त केला आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या मिसिंग लिंकचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

आचार्य सत्येंद्र दास यांच्यावर एसजीपीजीआयएमएसमध्ये न्यूरॉलॉजी विभागातील (वॉर्ड) हाय डिपेंडन्सी युनिट अर्थात एचडीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती प्रदीप दास यांनी दिली. प्रदीप दास हे आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. प्रदीप दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आचार्य सत्येंद्र दास यांनी बुधवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. सत्येंद्र दास यांच्या पार्थिवावर गुरुवार १३ फेब्रुवारी २०२५ रोजी अयोध्येत शरयू नदीकिनारी अंत्यसंस्कार केले जातील. काही दिवसांपूर्वी एसजीपीजीआयएमएस रुग्णालयाने काढलेल्या एका मेडिकल बुलेटिनमध्ये आचार्य सत्येंद्र दास यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे असल्याचाही उल्लेख होता.

पीएनबी बँक घोटाळा आरोपी मेहुल चोक्सीला कॅन्सर

कोण आहेत आचार्य सत्येंद्र दास ?

आचार्य सत्येंद्र दास ३३ वर्षांपासून राम मंदिराच्या सेवेत होते. ते दररोज प्रभूरामाच्या मूर्तीची पूजा करत होते. तत्कालीन खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रमुख अशोक सिंघल या दोघांनी पाठिंबा दिला आणि १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची राम मंदिरात मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती झाली होती. सत्येंद्र दास यांनी १९७५ मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य ही पदवी घेतली होती. ते काही काळ एका महाविद्यालयात संस्कृत व्याकरणाचे सहायक अध्यापक (सहायक शिक्षक) होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -