पिंपरी : बेकरीच्या व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. हिफाजत अली इनाम अली अन्सारी आणि समीर फिरोज अन्सारी, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील बिजनौ जिल्ह्यातील नगीना गावचे रहिवासी आहेत.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी या दोघांनी दुचाकीवरून येऊन दोन महिलांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सुमारे ८० ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पाहणी केली. त्यावरून आरोपी पिंपळेगुरव परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. येथील इमारतीच्या वाहनतळात शोध घेत असताना आठ फेब्रुवारी रोजी संशयित दुचाकी विशालनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
हिफाजत यास बेकरीच्या व्यवसायात नुकसान झाले होते. त्याकरिता २० तोळे सोने चोरी करून त्या माध्यमातून पैसे मिळवून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे होते. सोने चोरी करण्यासाठी आरोपी पिंपरी, चिंचवड, बाणेर, भोसरी परिसरात फिरत होते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…