रुपाली चाकणकरांबाबत आक्षेपार्ह Facebook Post करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.



महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील 'राजकारण महाराष्ट्राचे' या पेजवरुन जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तपास करुन पोलिसांनी आकाश डाळवे (३०, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि अविनाश पुकळे (३०, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांना अटक केली. आकाशला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तर अविनाशला उरळी कांचन, जि. पुणे येथून अटक करण्यात आली. दोघांना पोलिसांनी गिरगाव येथील १८ व्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्यासमोर हजर केले. याआधी याच प्रकरणात नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि