नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल एकाच मंचावर आमने सामने आले. या भेटी दरम्यान शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या घटनेनंतर उबाठा गटात नाराजी निर्माण झाली आहे.
सध्या राजकारणातील आकडेमोड कधी बदलतील हे सांगता येण्याजोगं नाही. अशातच काल पार पडलेल्या सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या भाषणात शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.
शरद पवार म्हणाले,” नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदेंचं नाव समोर येत. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योग्य दिशा देण्याचे काम केले. त्यांनी सर्वच पक्षांशी नेहमी सुसंवाद साधून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल.”
शरद पवार यांनी भाषणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गोड कौतुक केल्यानंतर शिंदेंनीही त्यांची भाषणातून त्यांची फिरकी घेतली. “पवारांची गुगली कोणाला कधी समजली नाही, त्यांच्या बाजूला बसणाऱ्यांनाही ती समजली नाही माझे आणि पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते माझ्यावर कधी गुगली टाकणार नाहीत.” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात नवं वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…