नवी दिल्ली : उत्तर भारतातील मैदानी भागातल्या थंडीची जागा आता उकाडा घेऊ लागला आहे. लवकरच देशातील अनेक राज्यांमध्ये उकाडा जाणवू लागेल. पण वातावरण बदलण्याच्या सुमारास देशातील आठ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, सिक्कीम या आठ राज्यांमध्ये १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुसळधार पावसाची आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटात तसेच ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आठ राज्यांसाठी हवामान विभागाने वर्तविला आहे.
ईशान्य भारतात पाऊस पडणार असल्यामुळे मध्य भारतात थंडीची तीव्रता वाढेल. पूर्व भारतात तसेच वायव्य भारतात उकाडा वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिवसा तापमान २७ अंश से. च्या आसपास राहील, असा अंदाज आहे.