मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यभरात थैमान घालणाऱ्या GBS ( गुलेन-बॅरे सिंड्रोम ) आजाराने मुंबईत एका रुग्णाचा बळी घेतला आहे. पुणे सोलापूर नंतर मुंबईतही GBS आजाराने शिरकाव केलेला पाहायला मिळतोय.
Pune News : पेपर सुरू असतानाच दुस-या मजल्यावरून विद्यार्थ्याने मारली उडी!
पुणे : कालपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२वीच्या परीक्षेदरम्यान पुण्यात एक धक्कादायक घटना घडली ...
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू GBS मुळे झाल्याचा उघडकीस आलं आहे. GBS च्या मृत्यूचा आकडा आता ८ वर गेला आहे. राज्यात १९७ रुग्ण आहेत सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यामध्ये १७२ रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.
महापालिका विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी येणार पाच कोटी खर्च
किड्झानिया पार्कसाठी प्रत्येक विद्यार्थी ७०० रुपये, तर राणीबागेत ६३० कोटी रुपये खर्च
मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापलिका शाळांमधील मुलांची यंदाही ...
तर ५० रुग्ण आयसीयु मध्ये दाखल केले आहेत आणि २० व्हेंटिलेटर असल्याचे समजते आहे. हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या आजाराची लक्षण जाणवताच प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
जीबीएसबाबतची महत्त्वाची माहिती
1.हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराची लक्षणे स्वाइन फ्लूसारखीच आहेत. या आजारावर अद्याप कायमस्वरुपी ठोस उपचार उपलब्ध झालेला नाही.
2.श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरची गरज भासते.
3.स्नायू कमकुवत होतात आणि अवयव सुन्न होतात.
4.पायांमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा येणे यासारखी लक्षणे दिसतात. नंतर ती हातांमध्येही पसरू शकतात. 5.यामुळे अर्धांगवायू किंवा कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो.
6.जीबीएसमध्ये अर्धांगवायू पायांपासून सुरू होऊ शकतो आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांपर्यंत पोहोचू शकतो.
7.लक्षणे सलग काही आठवडे टिकू शकतात.
8.वेळेत उपचार केल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते.
9.आजारी व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्याने उपचार करुन घेणे हिताचे.