Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीमहापालिका विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी येणार पाच कोटी खर्च

महापालिका विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी येणार पाच कोटी खर्च

किड्झानिया पार्कसाठी प्रत्येक विद्यार्थी ७०० रुपये, तर राणीबागेत ६३० कोटी रुपये खर्च

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापलिका शाळांमधील मुलांची यंदाही भायखळा राणीबाग आणि घाटकोपर येथील किडझानिया पार्कमध्ये नियोजित असून या किडझानिया पार्कसाठी विद्यार्थ्यांमागे प्रत्येकी ७०० रुपये, तर राणीबागेतील सहलीसाठी प्रत्येकी ६३० रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे राणीबागेची जागा महापालिकेची असूनही त्याठिकाणी महापालिका प्रत्येकी ६३० रुपये मोजणार आहे, महापालिका शाळांमधील इयत्ता ४थी विद्यार्थ्यांसाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय आणि इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घाटकोपर ‘किड्झानिया थीम पार्क, येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.

अनामत रकमेतून पालिका फिरवणार १६ हजार कोटींची रक्कम

महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महापालिका शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात. महापालिकेतील शालेय मुलांची सहल राणीबागेत आयोजित करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असून त्यानुसार मागील काही वर्षांपासून इयत्ता चौथीच्या मुलांना राणीबागेत सहलीसाठी नेले जाते. विमानात प्रवास करताना कशा प्रकारे वागले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींची पूर्तता व आवश्यक आहे. बँकेचे व्यवहार कसे करायचे, बिस्कोटे अथवा आईस्क्रीम कसे करावयाचे. आग लागल्यास फायर ब्रिग्रेड कार्य कसे करते अशा विविध गोष्टी विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळतात. त्यामुळे इयत्ता सातवीतील शालेय मुलांची सहल किडझानिया येथ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१५ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून) एकदिवसीय सहलींचे आयोजन करण्याच्या दृष्टिकोनातून शाळांकडून वेळापत्रक बनवण्यात आले आहे. यासाठी राणीबागेतील सहलीची जबाबदारी श्रीपांश एंटरप्रायझेस या कंपनीवर सोपवण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -