पुणे : कालपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२वीच्या परीक्षेदरम्यान पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरपत्रिका हातात आल्यानंतर बारकोड चिटकवला. मात्र पुढे विद्यार्थ्याने असं काही केलं ज्याने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नऱ्हे येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याने पेपर सुरू झाल्यानंतर बारकोड चिटकवत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या विद्यार्थ्याने दुसऱ्या माळ्यावरून उडी मारली असता तो पहिल्या माळ्याच्या व्हरांड्यात पडला. तिथूनही उठून त्याने पुन्हा उडी मारली. त्यात त्याला किरकोळ दुखापत झाली. या वेळी केंद्रावर भरारी पथक होते. या प्रकारामध्ये त्याच्या हातापायाला दुखापत झाली.
या संपूर्ण प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन, उपस्थित कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये नेले. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. पोलिसांनी चौकशीत विद्यार्थ्याला परीक्षेचा ताण आल्याने त्याने हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे.