महाकुंभ : माघ पौर्णिमेला दीड कोटी भाविकांचे स्नान

प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात माध पौर्णिमेच्या निमित्ताने आज, बुधवारी सुमारे दीड कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केल्याची माहिती प्रशासनाने दिली.


प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमापासून १० किलोमीटर पर्यंत सर्वत्र भाविकांची गर्दी दिसून आली. याठिकाणी मंगळवारी संध्याकाळपासूनच माघी पौर्णिमेचे स्नान सुरू झाले होते. रात्री उशिरा मोठ्या संख्येने भाविक संगमावर पोहोचले. तर आज, बुधवारी सकाळी भाविकांची संख्या वाढली.


हे स्नान बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू होते. दिवसभरात सुमारे अडीच कोटी भाविक त्रिवेणी संगमात स्नान केले असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. माघ पौर्णिमा स्नानासाठी आलेल्या भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. वाढती गर्दी पाहता प्रयागराजमध्ये वाहनांना प्रवेश बंद असून महाकुंभमेळा क्षेत्र 'नो व्हेईकल झोन' घोषित करण्यात आले होते.



उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाकुंभातील हे पाचवे स्नान आहे. महाशिवरात्रीचे स्नान अजून बाकी आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी एक चूक झाली. त्यातून धडा घेऊन अधिक चांगले व्यवस्थापन कसे करायचे, यावर आम्ही काम करत आहोत.


तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून प्रयागराज रेल्वे स्थानकांवर भाविकांची गर्दी कायम आहे. दररोज 100 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. शहरात मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत 108 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. यात उत्तर मध्य रेल्वेने 81 गाड्या, उत्तर रेल्वेकडून 10 आणि ईशान्य रेल्वेने 17 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. त्याचबरोबर, विशेष गाड्यादेखील सतत चालवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन