Sanju Samson : संजू सॅमसनच्या हाताच्या बोटावरील शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : भारतीय फलंदाज संजू सॅमसन हा इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर होता.त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. नुकतीच त्याच्या हातातील बोटावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांच्या संपूर्ण टीमसह हॉस्पिटलमधून संजू सॅमसनचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.


संजू सॅमसनच्या हाताच्या बोटाला मुंबईत इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या टी२० सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा एक वेगवान चेंडू सॅमसनच्या बोटाला लागला ज्यामुळे त्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला गेला होता. त्यानुसार संजू सॅमसनच्या हाताच्या बोटावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.या ऑपरेशननंतर सॅमसनच्या IPL २०२५ मध्ये खेळण्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सॅमसनला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल? तो आयपीएल २०२५ पर्यंत बरा होऊ शकेल का? असा सवाल राजस्थान रॉयल्सचे चाहते विचारू लागले आहेत.दरम्यान, संजू सॅमसन IPL २०२५ खेळणार का हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.



संजू सॅमसन इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या सर्व ५ टी२० सामन्यांचा भाग होता. त्याने बॅटने काही विशेष कामगिरी केली नाही. त्याला ५ सामन्यात फक्त ५१ धावा करता आल्या. या काळात त्याचा स्ट्राईक रेटही १२०च्या खाली होता. संजू सॅमसनच्या IPL मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या १६८ सामन्यांमध्ये ४४१९ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२४ मध्ये, त्याने राजस्थान रॉयल्ससाठी १५ डावात ५३१ धावा केल्या आहेत. तर भारतासाठी ५८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण १४७१ धावा केल्या आहेत. सॅमसनने भारतासाठी १६ एकदिवसीय आणि ४२ टी-२० सामने खेळले आहेत.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या