Political Breaking News : शरद पवारांनी केले एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक!

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल एकाच मंचावर आमने सामने आले. या भेटी दरम्यान शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या घटनेनंतर उबाठा गटात नाराजी निर्माण झाली आहे.


सध्या राजकारणातील आकडेमोड कधी बदलतील हे सांगता येण्याजोगं नाही. अशातच काल पार पडलेल्या सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या भाषणात शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.



काय म्हणाले शरद पवार ?


शरद पवार म्हणाले," नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदेंचं नाव समोर येत. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योग्य दिशा देण्याचे काम केले. त्यांनी सर्वच पक्षांशी नेहमी सुसंवाद साधून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल."



काय म्हणाले एकनाथ शिंदे ?


शरद पवार यांनी भाषणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गोड कौतुक केल्यानंतर शिंदेंनीही त्यांची भाषणातून त्यांची फिरकी घेतली. "पवारांची गुगली कोणाला कधी समजली नाही, त्यांच्या बाजूला बसणाऱ्यांनाही ती समजली नाही माझे आणि पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते माझ्यावर कधी गुगली टाकणार नाहीत." असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात नवं वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी