Bhadipa : इंडियाज गॉट लेटेन्टनंतर 'भाडिपा' वादाच्या भोवऱ्यात!

मुंबई : सध्या कॉमेडियन समय रैनाचा (Samay Raina) इंडियाज गॉट लेटेन्ट (Indias Got Latent) हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahabadia) पालकांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. यामुळे रणवीर अलाहबादिया आणि समय रैनाविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण चर्चेत असताना आता 'भाडिपा' चॅनेल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.



भाडिपा या युट्यूब चॅनलवरील 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' हा शो नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे. अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या कार्यक्रमात डबल मिनिंग, अश्लील आणि दर्जाहिन भाषेचा वापर करुन विनोद केला जातो. या शोमधील लहान मुलांचे काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या असल्याने त्यावर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच भाडिपा चॅनेलवर देखील बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.



भाडिपाची आशयाची पोस्ट


याबाबत भाडिपाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये 'भाडिपा फॅन्सना कळवण्यात वाईट वाटत आहे की, सध्या १४ फेब्रुवारी रोजी होणारा अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो आम्ही पोस्टपॉन करत आहोत. व्हॅलेन्टाईन्स डेला प्रोमोपेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या फॅन्सवर प्रेमच आहे. आमच्या टॅलेन्टला आणि प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे', अशा आशयाची पोस्ट भाडिपाने केली आहे.


त्याचबरोबर 'तिकिटांची रक्कम १५ दिवसांत तुमच्या बँक खात्यांवर जमा होईल. याच रिफंडच्या पैशांतून स्वत:साठी काहीतरी छान गिफ्ट घ्या. आमचा एक्स्क्लुझीव्ह कंटेन्ट पाहण्यासाठी यूट्यूब मेंबरशीप चालू केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदोपोहेचे सर्व व्हिडीओज १८ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठीच पाहायला उपलब्ध करून दिले आहे,; असेही भाडिपाने सांगितले आहे.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या