रिंकू राजगुरूच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

मुंबई : 'सैराट' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरूचा मोठा चाहतावर्ग आहे. रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.मात्र, यावेळी रिंकूने नाही तर भाजपा खासदाराच्या चिरंजीवांनी रिंकूसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.


भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कृष्णराज यांनी रिंकूबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला, तो फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक व रिंकू राजगुरू श्री महालक्ष्मी मंदिराबाहेर उभे असलेले दिसत आहेत. "आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले," असं कॅप्शन या फोटोला कृष्णराज महाडिक यांनी दिलं आहे.



 

कृष्णराज महाडिक हे युट्यूबर व उद्योजक आहेत. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो, व्हिडीओ व व्लॉग शेअर करत असतात. नुकताच त्यांनी रिंकू राजगुरूबरोबरचा एक फोटो पोस्ट केला, त्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. नेटकरी या फोटोवर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.दरम्यान, अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी कोल्हापुरात 'राजर्षी शाहू महोत्सवा'साठी गेली होती. त्यानंतर ती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनाला गेली होती. त्याचवेळी कृष्णराज महाडिक दर्शनासाठी मंदिरात आले होते. त्या भेटीदरम्यान त्यांनी फोटो काढला. तोच फोटो कृष्णा महाडिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला, अशी माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी