
नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे महाकुंभमेळ्यात भाविकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. अशातच आता माघी पौर्णिमेच्या प्रार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात (MahaKumbh Mela) भाविकांची होणारी मोठी गर्दी पाहता उत्तर प्रदेश सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

नवी दिल्ली : दारूचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण तरीही लोक नशा करण्यासाठी ते पितात. मात्र तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तेलंगणा ...
मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने १२ फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजमध्ये वाहनांना बंदी घातली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आता केवळ कुंभमेळा परिसरातच नव्हे, तर संपूर्ण प्रयागराज शहरात वाहनबंदी करण्यात करण्यात आली आहे, कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. (MahaKumbh Mela)
संपूर्ण शहरात नो-व्हेईकल झोन
महाकुंभमेळा क्षेत्रच नव्हे, तर संपूर्ण प्रयागराज शहर १२ फेब्रुवारीपर्यंत नो-व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाविकांच्या वाहनांनाही आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे स्नानासाठी आलेल्या लाखो भाविकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
केवळ प्रशासनाच्या वाहनांना परवानगी
उत्तर प्रदेश सरकारच्या नव्या आदेशानुसार, केवळ अधिकाऱ्यांची आणि आरोग्य विभागाच्या वाहनांना प्रगायगराजमध्ये परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, व्हीव्हीआयपी पासही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही खास व्यक्तीसाठी नियम शिथिल केले जाणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. प्रयागराजला येणाऱ्या भाविकांना स्वतःची वाहने शहराबाहेरील पार्किंगमध्ये ठेवावी लागणार आहेत. तसेच ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना रेल्वे स्थानकावर उतरून पायी संगमपर्यंत जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ८ ते १० किमीची पायी यात्रा करावी लागण्याची शक्यता आहे.
अक्षयवटसह लेटे हनुमान मंदिर बंद
माघी पौर्णिमेच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने अक्षयवट आणि लेटे हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. १२ फेब्रुवारीपर्यंत ही दोन्ही मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या नव्या निर्बंधांमुळे भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.