Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Tirupati Balaji Laddu Controversy : तिरुपती प्रसाद भेसळ प्रकरणी ४ जणांना अटक

Tirupati Balaji Laddu Controversy : तिरुपती प्रसाद भेसळ प्रकरणी ४ जणांना अटक

तिरुमला : आंध्रप्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादातील तुपात प्राण्यांच्या चरबीचे आरोप झाले होते. याप्रकरणी सीबीआयच्या नेतृत्त्वात स्थापन केलेल्या एसआयटी पथकाने ९ फेब्रुवारी रोजी विविध डेअरीशी संबंधीत चौघांना अटक केलीय.



यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, विशेष तपासणी पथकाने श्री व्यकटेश्वर स्‍वामी मंदिरातील भक्‍तांना प्रसादाच्या स्‍वरूपात देण्यात येणाऱ्या प्रसाद लाडूमध्ये कथितरीत्‍या भेसळप्रकरणी ४ लोकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये भोले बाबा डेअरीचे माजी संचालक विपिन जैन आणि पोमिल जैन, वैष्णवी डेअरीचे अपूर्व चावडा आणि एआर डेअरीचे राजू राजशेखरन यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या चौकशीत तूप पुरवठ्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनियमितता उघडकीस आली, ज्यामुळे अटक करण्यात आली. त्यांनी आरोप केला की वैष्णवी डेअरीच्या अधिकाऱ्यांनी मंदिराला तूप पुरवण्यासाठी एआर डेअरीच्या नावाने निविदा मिळवल्या आणि निविदा प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी बनावट रेकॉर्ड तयार करण्यातही त्यांचा सहभाग होता.

Comments
Add Comment