विदिशा : मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एका लग्नाच्या संगीत सोहळ्यात धक्कादायक घटना घडली. संगीत सोहळ्यात स्टेजवर नाचत असलेली २३ वर्षांची तरुणी अचानक कोसळली. नाचता नाचता पडलेली ही मुलगी नंतर उठलीच नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तरुणीचे क्षणार्धात निधन झाले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Mumbai – Pune Expresshighway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत बदल!
लग्नाच्या संगीत सोहळ्यातील धक्कादायक घटना
.
.
.#prahaarnewsline #newsupdate #marriage #songs #dance pic.twitter.com/u6Zjhnk3YP— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) February 10, 2025
मृत तरुणीचे नाव परिणीता असे होते. ती मूळची इंदूरची रहिवासी होती. चुलत भावाच्या लग्नासाठी ती विदिशात आली होती. शनिवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री लग्नाच्या संगीत सोहळ्यात ती स्टेजवर नाचत होती. उत्साहाने नृत्य करत असलेल्या परिणीताला अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. परिणीताला हृदयविकाराचा झटका आल्याचे ती स्टेजवर कोसळेपर्यंत कोणाच्याही लक्षात आले नाही. ही धक्कादायक घटना डोळ्याचे पाते लवते न लवते तोच घडली होती. नाचत असलेली परिणीता स्टेजवर कोसळली आणि तिची हालचाल थांबली. काय घडले हे बघण्यासाठी उपस्थित मंडळी स्टेजजवळ गेली तेव्हा त्यांना धक्का बसला. परिणीताचा मृत्यू झाला होता.
नातलगांपैकी कोणीतरी सीपीआर देऊन तिला जीवदान देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तिला विदिशा येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर रात्रीच्या वेळी लग्नाचे विधी साध्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले. रविवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि तिचे बहुतेक नातेवाईक विदिशा येथे असल्याने, तिचे अंतिम संस्कार देखील तिथेच करण्यात आले.