फेब्रुवारीत एप्रिलसारखे उन्हाचे चटके !

उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण


मुंबई (वार्ताहर) : जानेवारी महिन्यात काही दिवस गारवा अनुभवता आला. त्यानंतर कमाल तापमान ३० ते ३४ अंशाच्या आसपास असून किमान तापमानात देखील हळूहळू वाढ होत आहे. सध्या दिवसा शहरात उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. तर रात्री उकाडा जाणवत आहे. दर दोन दिवसांनी कमाल आणि किमान तापमानात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांना त्या बदलांचा त्रास होताना दिसत आहे.


सध्याचा काळ हा तापमान बदलाचा काळ असून वाऱ्यांच्या दिशेमुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आहे तर किमान तापमान किंचित चढे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तसेच फेब्रुवारी महिन्यादरम्यान ऋतू बदलाची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे मुंबईच्या तापमानाचा पारा आता काहीसा वाढू लागला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल तापमान ३३ ते ३६ अंशादरम्यान राहील. यावेळी दिवसा उन्हाचा चटका जाणवेल. तसेच उकाड्याची देखील जाणीव होईल.


यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगराचे तापमान ३४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने मुंबईकरांना चांगलाच घाम फुटला आहे. शनिवारी, ३४.५ सांताक्रूझमध्ये कमाल तापमान नोंदले गेले. सध्या वाढलेले तापमान ही उन्हाळ्याची चाहूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले. तसेच सध्या कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक आहे. दरम्यान, मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत किमान तापमानाचा पारा अजूनही कमी आहे. मात्र, कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे ही उन्हाळ्याची चाहुल आहे. येत्या एक दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ अपेक्षित असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते