खडकवासला : टवाळखोरांनी फटाके फोडल्यामुळे पर्यटकांवर संकटावर ओढवले. लोणावळ्यात एकविरा गडाच्या पायथ्याशी काही टवाळखोर मुलांनी फटाके फोडले. यामुळे प्रचंड धूर झाला. धुराचा परिसातील मधमाशांना त्रास झाला. त्रासलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. यानंतर सिंहगडावर रविवारी ९ फेब्रुवारी रोजी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली.
Ranveer Allahbadia : बीअरबायसेप्स पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया वादाच्या भोवऱ्यात
खडकवासला येथील सिंहगडाच्या कल्याण दरवाजावर संध्याकाळी पर्यटक गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काही पर्यटक सूर्यास्त बघण्यासाठी तिथे गेले होते. निवडक पर्यटक सूर्यास्त बघत होते तर मर्यादीत पर्यटक गडावरुन खाली उतरत होते. त्याच वेळी कल्याण दरवाजाच्या तटबंदीखाली कड्यावर असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला.
Aeroindia 2025 : बंगळुरूच्या एअर शो मध्ये रशिया आणि अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ विमानं
या हल्ल्याचं कारण अस्पष्ट असलं तरी मधमाशांचा धोका पाहून वनविभागाने पर्यटकांना गडावर जाण्यास बंदी घातली. या हल्ल्यात २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाले. यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना सुखरुप गडाखाली आणून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. वनविभागाच्या तत्परतेने हजारो पर्यटकांचे प्राण वाचले.