मुंबई : विनोदवीर प्रणित मोरेला झालेल्या मारहाणीनंतर आता बीअरबायसेप्स युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील शिंदे यांचा नातू वीर पहारियावर जोक केला म्हणून प्रणित मोरेला मारहाण झाली होती. सोलापूरमध्ये ही घटना घडली होती. आता युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया याने समय रैनाच्या “इंडियाज गॉट लेटेंट” शो दरम्यान केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे.
CM Devendra Fadnavis And Raj Thackeray : फडणवीसांच्या ‘शिवतीर्थ’वरील भेटीचं ‘राज’ काय ?
रणवीर अल्लाहबादिया “बीअरबायसेप्स” युट्यूब चॅनेलसाठी पॉडकास्टर आहे. त्याचे युट्यूबवर १ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. याच रणवीरने विनोदी कलाकार समय रैनाच्या “इंडियाज गॉट लेटेंट” शोवर वादग्रस्त विधान केले. “तुम्ही आयुष्यभर तुमच्या पालकांना दररोज सेक्स करताना पाहाल की एकदा सामील होऊन ते कायमचे थांबवाल” अशी टिप्पणी रणवीरने केली. यामुळे रणवीरवर टीका केली जात आहे.
Nahh man 😭
Beerbicep’s would you rather are wild 😭😭 pic.twitter.com/GKJGw4BYke— CaLM dAdA (@faded_clone17) February 8, 2025
नमो कुस्ती महाकुंभ-२ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचा मोठा सन्मान
या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलताना याबाबतीत म्हणाले “आपल्या समाजात आपण काही नियम बनवले आहेत, जर कोणी त्यांचे उल्लंघन केले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.” दरम्यान आता रणवीरने केलेल्या या वक्तव्यावर त्यासंदर्भात व्हिडिओ करून प्रेक्षकांची माफी मागितली आहे.