Ration Card e-KYC : रेशन कार्डचं ई-केवायसी करण्यासाठी उरले 'इतके' दिवस!

  149

अमरावती : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना रेशनधान्याचा पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातील बोगस रेशनकार्ड धारकांचा शोधा घेण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (E-KYC) करण्याची अट घातली आहे. यासाठी पुरवठा विभागाने पुन्हा मुदतवाढ केली आहे.



अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे. यासाठी पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. या अवधीत ई-केवायसी न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे.



का केली जाते ई-केवायसी ?


शिधापत्रिक आधार क्रमांकासह संलग्न केल्यानंतर संबंधित कार्डधारकांचा अधार क्रमांक अचूक आणि तोच आहे, याची पडताळणी (सत्यापन) या प्रक्रियेद्वारे केली जाते. ओळख व पत्ता यासाठीदेखील ई-केवायसीची प्रक्रिया महत्त्वाची आहे.



शिधापत्रिकेतील सर्व व्यक्तींचे सत्यापण


शिधापत्रिकेत नमूद सर्वच व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन सत्यापण करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ज्या व्यक्तीचे सत्यापण होणार नाही, त्याचे नाव शिधापत्रिकेमधून वगळले गेल्यास व परिणामी त्यांचे शिधाजिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राहील.



३३ टक्के शिधापत्रिकाधारकांनी फिरविली पाठ


रेशन दुकानात ई-केवायसी करण्यासाठी फक्त अधार कार्ड व शिधापत्रिका याच दोन गोष्टी आवश्यक आहेत. तरीही लाभार्थ्यांद्वारा टाळाटाळ करण्यात येत आहे.


महिन्याचे धान्यदेखील मिळणार नाही

प्रधान्य गट लाभार्थी - १५,१२,१३०

ई-केवायसी बाकी - ६,७५,३७७

अंत्योदय लाभार्थी - ४,७८,५४८

प्राधान्य गट कार्ड - ३,७४,३३५

अंत्योदय - १,२८,२०७

ई-केवायसी बाकी तालुकानिहाय लाभार्थी


अचलपूर ७६,४५६, तहसील ४०,१५३, मोर्शी ३६,३६३, अंजनगाव ३५,७०२, भातकुली २८,७९७, चांदूररेल्वे १७,२२४, चांदूरबाजार ६१,३३०, चिखलदरा ३४,९३८, दर्यापूर ३१,६६४, धामणगाव रेल्वे २८,७३६, धारणी ५९,३९९, नांदगाव खंडेश्वर १८,३३३, तिवसा २८,१५२, वरुड ४२,६४२ व अमरावती एफडीओमध्ये १,३५६,४८३ लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने