"परीक्षा पे चर्चा" उपक्रमाचे सोमवारी आठवे सत्र

नवी दिल्ली : परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनेकदा तणावाचा विषय ठरतात, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "परीक्षा पे चर्चा" उपक्रमाने या संकल्पनेत सकारात्मक बदल घडवला आहे. यावर्षी १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यंदाच्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे सत्र होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि पालकांशी थेट संवाद साधणार आहेत. प्रत्येक वर्षी होणारे परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे सत्र, हे परीक्षेसंदर्भातील तणाव दूर करण्यासाठी नवा आणि अभिनव दृष्टिकोनच मांडत असते आणि त्यातून शिकणे आणि जगण्याकडे एकप्रकारचा सोहळा साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याच्या मानसिकतेला नव्याने चालना देत असते.

नवे विक्रम प्रस्थापित करणारी परीक्षा पे चर्चा २०२५

यंदा १० फेब्रुवारी २०२५ रोजी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे ८ वे सत्र होणार आहे. खरे तर या उपक्रमाने या आधीच नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. यंदाच्या उपक्रमासाठी तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. त्यामुळे एका अर्थाने या उपक्रमाने एका लोकचळवळीचे स्वरुपच धारण केले असून, हा उपक्रम शिकण्याच्या सामुदायिक सोहोळ्यामागची प्रेरणाच ठरू लागला आहे. यंदा, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील तिथल्या स्थानिक शिक्षण मंडळाच्या शासकीय शाळा, केंद्रीय विद्यालये, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि नवोदय विद्यालयांमधून 36 विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे. यंदाच्या परीक्षा पे चर्चा २०२५ मध्ये एकूण सात प्रेरणादायी सत्रे होणार आहे.
Comments
Add Comment

भारताचे अस्त्र क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या विमानांचा वेध घेणार

नवी दिल्ली : डीआरडीओने अर्थात भारतीय संरक्षण संशोधन प्रबोधिनीने अस्त्र क्षेपणास्त्राची आधुनिक आवृत्ती विकसित

बिपिन जोशीची हमास दहशतवाद्यांकडून हत्या

युद्धात ठार झालेला एकमेव हिंदू इस्रायल-हमास युद्धात नेपाळचा तरुण विद्यार्थी बिपिन जोशीला हमासच्या

सुशांत सिंह राजपूतची बहीण बिहारमध्ये लढवणार निवडणूक

देशात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी अनेकांची नावं समोर येत आहेत.

पंतप्रधान मोदी आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा करणार शुभारंभ

पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रचार मोहिमेचा

जैसलमेरमध्ये भीषण अपघात, बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू

मुंबई : जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या एका खासगी बसला जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना