मुंबई : प्रेमाचा महिना म्हणून ओळखल्या जाणारा फेब्रुवारी महिना प्रत्येक प्रेम करू पाहणाऱ्या आणि करणाऱ्या प्रेमींसाठी महत्त्वाचा असतो. ७ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या व्हॅलेंटाईन वीकचा तरुणाईमध्ये वेगळाच उत्साह असतो. मात्र प्रत्येक देशात व्हॅलेंटाईन वीक वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. भारतामध्ये प्रियकर – प्रेयसीला तर प्रेयसी – प्रियकराला आठवडाभर विविध भेटवस्तू देऊन व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात. कितीही म्हटलं प्रेम करायचा असा कोणता ठराविक दिवस नसतो तरी या दिवसाची प्रेमीयुगुल आतुरतेने वाट पहात असतात.
Mexico : मेक्सिकोत ट्रक-बसच्या धडकेत बसला भीषण आग; ४१ जणांचा होरपळून मृत्यू
भारताचा मित्र देश मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत कँडी हार्ट चॉकलेट देऊन एकमेकांप्रती असलेल्या भावना व्यक्त करतात. तसेच जपानमध्ये व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी महिला पुरुषांना चॉकलेट देतात. जपानमध्ये १९५० पासून या प्रथेचा पायंडा पडला आहे. नंतर एक महिन्याने तिथे व्हाईट डे साजरा केला जातो जेव्हा पुरुष महिलांना काही भेटवस्तू देतात. त्याच्या उलट दक्षिण कोरिया मध्ये ब्लॅक अँड व्हाईट डे साजरा केला जातो.
अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू
दक्षिण कोरियात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी प्रेयसी प्रियकराला चॉकलेट देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. त्या निमित्ताने तेथील मुली पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात तर कोणत्याही प्रेमाच्या नात्यात न अडकलेली मुलं काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. फिनलँड सारख्या देशात व्हॅलेंटाईन डे हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. येथे मित्रमंडळींना शुभेच्छा देतात. एकमेकांना भेटवस्तू पाठवतात. या दिवसाचा उद्देश केवळ प्रियकर आणि प्रेयसी मधील नातेसंबंध नव्हे तर सर्व प्रकारचे नाते दृढ करणे हा आहे.