Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत मागेल त्याला पाणी, १५ हजार जलजोडण्यांना दिली परवानगी

मुंबईत मागेल त्याला पाणी, १५ हजार जलजोडण्यांना दिली परवानगी

मुंबई : मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मागेल त्याला पाणी यानुसार सर्वांसाठी पाणी धोरण जाहीर केले. या निर्णयानुसार महापालिकेत निवासी जागांना जलजोडण्या देण्यासाठी आतापर्यंत १५,३७५ जलजोडण्यांना महापालिकेच्य जलअभियंता विभागाच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण ७८६८ जलजोडण्यात देण्यात आल्या आहेत.

मुंबईचा किनारा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला होणार ?

मुंबई महापालिकेने सर्व निवासी जागांना जलजोडण्या देण्याच्या हेतून जून २०२२ पासून सर्वांसाठी पाणी या सर्वसामावेश धोरणांची अंमलबजावणी सुरु केली. त्यामुळे जून २०२२ पासून १९९५ आणि त्यानंतरच्या झोपडपट्ट्या, अनधिकृत बिगर झोपडपट्टी बांधकामे आणि गावठाण तसेच कोळीवाड्यतील रहिवाशांना पाणी पुरवठा मंजूर करण्यासाठी हे धोरण मंजूर केले होते. भारताच्या राज्यघटनेतील कलम २१ मधील तरतुदींनुसार प्रत्येक नागरिकाला चांगले अन्न, शुद्ध पाणी व हवा मिळणे हा मूलभूत हक्क असल्याने मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व निवासी जागांना, घरांना व झोपड्यांना जल जोडणी देण्याबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या हेतूने नवीन धोरण तयार करण्यात आले आहे.

खार रोडच्या रेल्वे कारशेडला आग

मुंबई महापालिकेने मागेल त्याला पाणी पुरवठा करण्याचे धोरण बनवत महापालिका व राज्य सरकारच्या व्यतिरिक्त इतर जागांवर वसलेल्या झोपडपट्टयांसह ओसी नसलेल्या इमारतींना पाणी पुरवठा करण्याचे धोरण जाहीर केले होते. या धोरणाला १० जानेवारी २०१७ रोजी महापालिकेने मंजुरी दिली होती. पंरतु त्यामध्ये केंद्र सरकार व इतर जमिनींवरील झोपड्यांचा तसेच त्या जागांवरील ओसी नसलेल्या इमारतींना समान धोरणानुसार पाणी पुरवठा करण्याच्या उल्लेख नसल्याने अनेकांना याच लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हे धोरण मंजूर होऊनही सुधारीत धोरण बनवून याची अंमलबजावणी व्हायला जून २०२२ उजाडले.

समृद्धी महामार्गावर फूडकोर्ट, स्वच्छतागृह या सुविधा उभारणार

या धोरणाच्या प्रत्यक्ष अमंलबजावणीनुसार, डिसेंबर २०२३ पर्यंत महापालिकेकडे जलजोडणीसाठी ११,३७३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैंकी महापालिकेने मागील वर्षी ९,९०१ जलजोडणींना परवानगी दिली होती आणि त्यातील ४,१७९ एवढया जलजोडण्या दिल्या होत्या.

तर डिसेंबर २०२४ पर्यंत महापालिकेने १५,३७५ जलजोडण्यांना परवानी दिल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे. त्यापैंकी आतापर्यंत एकूण् ७,८६८ नवीन जलजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षभरात महापालिकेने ३,६८९ जलजोडण्यात दिल्या आहेत, मागील वर्षी ४,१७९ जलजोडण्यात दिल्या होत्या असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -