मुंबई : खार रोडच्या रेल्वे कारशेडला आग विझवण्यात अग्निशमन दल यशस्वी झाले आहे. कारशेडला शनिवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. ही लेव्हल वनची (एक नंबरची आग) आग होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी संयुक्त कारवाई केली आणि मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले होते. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. स्थानिकांनी वेळेत माहिती दिल्यामुळे संकट टळले. नियमानुसार आग प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
खार रोडच्या रेल्वे कारशेडला आग
