Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीसमृद्धी महामार्गावर फूडकोर्ट, स्वच्छतागृह या सुविधा उभारणार

समृद्धी महामार्गावर फूडकोर्ट, स्वच्छतागृह या सुविधा उभारणार

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग या देशातील सर्वाधिक लांबीच्या द्रुतगती मार्गावर २१ ठिकाणी फूडकोर्ट, स्वच्छतागृह आदी सुविधा उभारण्याचा निर्णय झाला आहे. वे-साइड ॲमिनिटीज श्रेणीतील या सुविधा उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे.

मुंबईचा किनारा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला होणार ?

समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा आहे. त्यातील ६२५ किमी लांबीचा मार्ग आतापर्यंत तीन टप्प्यांत वाहनचालकांसाठी सुरू झाला आहे. पण रस्ता लवकर सुरू करण्याला प्राधान्य दिल्यामुळे या महामार्गावर थांबण्यासाठीच्या सुविधा नव्हत्या. यामुळे सलग अनेक तास प्रवास केल्याने रस्ते संमोहन होऊन अपघाताच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रस्त्यालगतच्या सुविधांची तयारी सुरू केली आहे. यामुळे अपघात टळण्याची आशा आहे.

खार रोडच्या रेल्वे कारशेडला आग

समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी (दोन्ही बाजूंना १०-१०) अशा सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. यात चार हेक्टरवर किमान ५० कोटी रुपये गुंतवून सुविधा उभारल्या जातील. फूड कोर्ट अर्थात खाण्या-पिण्याची सोय आणि निवडक स्वच्छतागृह तातडीने करण्याचे नियोजन आहे. महामंडळाने २१ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी निविदा काढली आहे. निविदेनुसार मुंबई ते नागपूर मार्गावर १० आणि नागपूर ते मुंबई मार्गावर ११ ठिकाणी स्वच्छतागृह उभारायची आहेत.

नागपूर दिशेकडील वायफळ (नागपूर), गुंदेवाडी व मानकापूर (वर्धा), दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), दवाळा (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) यांचा समावेश आहे. तर मुंबई दिशेने वायफळ (नागपूर), गणेशपूर (वर्धा), शिवनी (अमरावती), ताथोड अखतवाडा व दव्हा (वाशिम), डोणगाव व मांडवा (बुलडाणा), कडवांची (जालना), पोखरी व अनंतपूर (छत्रपती संभाजीनगर) आणि मराळ (नाशिक) येथे अत्याधुनिक स्वच्छतागृहांची सुविधा निर्माण केली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -