गौतम अदानींनी मुलाचं लग्न साधेपणानं करुन केलं कोट्यवधींचं दान

  114

अहमदाबाद : अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मुलाचा विवाह साधेपणाने केला. मुलाच्या लग्नाचा आनंद त्यांनी कोट्यवधी रुपयांचं दान करुन साजरा केला. जीत गौतम अदानी यांच्या विवाहानिमित्त गौतम अदानी यांनी समाजसेवेसाठी कोट्यवधींचं दान केल्याचं जाहीर केलं. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी अदानींनी दान केलं.





समाजातील सर्व घटकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी रुग्णालये, शिक्षणसंस्था, प्रशिक्षण संस्था यांना गौतम अदानी यांनी कोट्यवधी रुपयांचं दान केलं.



मुलगा जीत आणि दिवा हे दोघे अहमदाबादमधील अदानी शांतीग्राम वसाहतीमधील बेलवेदर क्लबमध्ये शुक्रवारी ७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी विवाहबद्ध झाले. विवाह गुजराती पद्धतीने झाला. साधेपणाने पण सर्व परंपरागत धार्मिक विधी करुन विवाह करण्यात आला. याप्रसंगी मोजके नातलग उपस्थित होते. जीतच्या विवाहाच्या दोन दिवस आधी गौतम अदानी यांनी 'मंगल सेवा' या समाजसेवी उपक्रमाची घोषणा केली. त्याद्वारे पाचशे विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य देण्यात येणार आहे.



विवाहाच्या निमित्ताने जीत यांनी २१ नवविवाहित अपंग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेऊन त्यांनाही अर्थसहाय्य दिले. जीत अदानी हे अदानी एअरपोर्ट्सचे संचालक आहेत. या कंपनीतर्फे मुंबईसह सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते आणि नवी मुंबई येथील सातव्या विमानतळाच्या उभारणीचे कामही कंपनीतर्फे केले जात आहे.
Comments
Add Comment

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या

एलन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात परवाना

आता प्रत्येक गावात पोहोचणार थेट इंटरनेट नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक

इंडिगो फ्लाइटमध्ये हाणामारी! एकाने दुसऱ्याच्या दिली कानशिलात, पुढे काय झाले? पहा व्हिडिओ

कोलकाता: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एअर होस्टेस एका प्रवाशाला मदत करताना दिसून येत आहे.