Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीगौतम अदानींनी मुलाचं लग्न साधेपणानं करुन केलं कोट्यवधींचं दान

गौतम अदानींनी मुलाचं लग्न साधेपणानं करुन केलं कोट्यवधींचं दान

अहमदाबाद : अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मुलाचा विवाह साधेपणाने केला. मुलाच्या लग्नाचा आनंद त्यांनी कोट्यवधी रुपयांचं दान करुन साजरा केला. जीत गौतम अदानी यांच्या विवाहानिमित्त गौतम अदानी यांनी समाजसेवेसाठी कोट्यवधींचं दान केल्याचं जाहीर केलं. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी अदानींनी दान केलं.

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर आता होणार सुसाट प्रवास!

समाजातील सर्व घटकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी रुग्णालये, शिक्षणसंस्था, प्रशिक्षण संस्था यांना गौतम अदानी यांनी कोट्यवधी रुपयांचं दान केलं.

दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे महत्त्वाचे…

मुलगा जीत आणि दिवा हे दोघे अहमदाबादमधील अदानी शांतीग्राम वसाहतीमधील बेलवेदर क्लबमध्ये शुक्रवारी ७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी विवाहबद्ध झाले. विवाह गुजराती पद्धतीने झाला. साधेपणाने पण सर्व परंपरागत धार्मिक विधी करुन विवाह करण्यात आला. याप्रसंगी मोजके नातलग उपस्थित होते. जीतच्या विवाहाच्या दोन दिवस आधी गौतम अदानी यांनी ‘मंगल सेवा’ या समाजसेवी उपक्रमाची घोषणा केली. त्याद्वारे पाचशे विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य देण्यात येणार आहे.

विवाहाच्या निमित्ताने जीत यांनी २१ नवविवाहित अपंग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेऊन त्यांनाही अर्थसहाय्य दिले. जीत अदानी हे अदानी एअरपोर्ट्सचे संचालक आहेत. या कंपनीतर्फे मुंबईसह सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते आणि नवी मुंबई येथील सातव्या विमानतळाच्या उभारणीचे कामही कंपनीतर्फे केले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -