Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीदहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे महत्त्वाचे...

दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे महत्त्वाचे…

मुंबई: इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने दडपणाखाली असतात. या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळस्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बोर्डातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ व दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आलेल्या आहेत.

Exam Tips: बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवण्याचे आलेय टेन्शन? फॉलो करा या टिप्स

भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न याबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये, असे राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे

१) ९०११३०२९९७, २) ८२६३८७६८९६, ३) ८७६७७५३०६९, ४) ७३८७४००९७०, ५) ९९६०६४४४११, ६) ७२०८७७५११५ ७) ८१६९२०२२१४, ८) ९८३४०८४५९३, ९) ८३२९२३००२२, १०) ९५५२९८२११५

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -