नवी दिल्ली : दारू परवाने देताना ‘आप’ने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपाने केला. विधानसभा निवडणुकीत भाजपाने हा मुद्दा वापरला. या व्यतिरिक्त आम आदमी पार्टीने दिलेली अनेक आश्वासनं अद्याप पूर्ण केली नसल्याचेही भाजपाने दिल्लीकरांना ठासून सांगितले. भाजपाचा हा प्रचार प्रभावी ठरला. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव करत भाजपाने दिल्ली जिंकली.
दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (निवडणूक आयोगाचे निकालाचे पान)
दिल्ली दारू घोटाळ्याने निवडणुकीत ‘आप’ला बुडवले. या प्रकरणात ईडीने तपास सुरू केल्यापासून आम आदमी पार्टी आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या. केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. काही महिन्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. वेगवेगळ्या गंभीर आरोपांमध्ये ‘आप’च्या निवडक नेत्यांना तुरुंगात जावे लागले. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. या सगळ्याचा जबर फटका आम आदमी पार्टीला बसला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या हाती आलेल्या निकालांनुसार, भाजपाने आठ जागा जिंकल्या आणि ४० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पार्टीने आठ जागा जिंकल्या आहेत आणि १० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. विधानसभेच्या ७० पैकी बहुसंख्य जागा भाजपा जिंकत असल्याचे चित्र आहे. दिल्लीत स्पष्ट बहुमतासह भाजपाची सत्ता येत असल्याचे दिसत आहे.
केजरीवालांनी मुख्यमंत्री या पदाचा राजीनामा दिला आणि आतिषी यांना मुख्यमंत्री केले. पण आतिषी यांना छाप पाडता आली नाही. प्रचार सुरू असताना भाजपाच्या विरोधातील इंडी आघाडीत फूट पडली. शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांनी केजरीवालांना तोंडी पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रचारात इंडी आघाडीचे अनेक नेते सहभागी झाले नाही, तर काहींनी निव्वळ औपचारिकता केली.
काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांनी केजरीवालांविरोधात दंड थोपटले. स्वाती मालीवाल यांनी उघडपणे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात प्रचार केला. या सगळ्याचा परिणाम झाला. मतदारांमध्ये ‘आप’विरोधी वातावरण निर्माण झाले.
दिल्लीत काही वर्षांपूर्वी अण्णा हजारेंच्या नेतृत्वात अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले होते. अण्णांच्या आंदोलनातून केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसची कोंडी करण्यात आली होती. याचा फायदा पुढे केजरीवालांना विधानसभा निवडणुकीत झाला. पण यावेळी अण्णांनी जाहीरपणे अरविंद केजरीवाल स्वार्थी आहेत आणि ते आंदोलनावेळी जाहीर केलेल्या उद्देशांपासून भरकटले असल्याचा आरोप केला. याचाही ‘आप’ला फटका बसला.
भाजपाने मात्र उत्तम नियोजन केले. केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या मदतीने जोरदार प्रचार केला. भाजपा म्हणजे विकास हे सूत्र लोकांना पटवून देण्यात पक्ष यशस्वी झाला. यामुळे दिल्लीतील सर्व जातीधर्माच्या मतदारांमध्ये भाजपाविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.
भाजपाचे विजयी उमेदवार (निवडणूक आयोगाने दिलेली माहिती)
शालीमार बाग – रेखा गुप्ता
त्रिनगर – तिलक राम गुप्ता
राजौरी गार्डन – मंजिंदर सिंग सिरसा
राजिंदर नगर – उमंग बजाज
संगम विहार – चंदन कुमार चौधरी
ग्रेटर कैलाश – शिखा रॉय
पतपरगंज – रविंदर सिंग नेगी (रवी नेगी)
गांधी नगर – अरविंदर सिंग लव्हली
आपचे विजयी उमेदवार (निवडणूक आयोगाने दिलेली माहिती)
सुलतानपूर माजरा – मुकेश कुमार अहलावत
चांदनी चौक – पुनरदीप सिंग सावनी (सब्बी)
बल्लीमारन – इम्रान हुसेन
तिलक नगर – जर्नेल सिंग
दिल्ली कॅन्ट – वीरेंद्र सिंग कडियान
तुघलकाबाद – साही राम
कोंडली – कुलदीप कुमार (मोनु)
बाबरपूर – गोपाल राय
…………………….
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…