मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी नागपूरमध्ये झाला. या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट राखत विजय मिळवला.
या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करत २४९ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३३ षटकांत ३ विकेट गमावत २२० धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने ५.४ षटकांत ३१ धावा करण्यासाठी ३ विकेट गमावल्या.
सामना जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, सामन्यात सगळं काही चांगलं होतं. मात्र शेवटी सामना जिंकण्याच्या जवळ असताना इतके विकेट गमावले हे होता कामा नये.
सामन्यात २ धावा करणाऱ्या रोहितने म्हटले, एक टीम म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी योग्य करायच्या होत्या. मला वाटते की प्रत्येकाने योग्य बॉक्स टिक करावा. बॅटिंग असो वा बॉलिंग सगळ्यांनी योग्य करा. दरम्यान,सामन्याच्या शेवटी शेवटी आम्ही ज्या विकेट गमावल्या त्या गमावल्या नाही पाहिजे होत्या.