
प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी आग लागल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. महाकुंभाच्या सेक्टर २२ आणि सेक्टर १९ मधील अनेक तंबूंना आग लागली होती. या घटनेला आठवडाही उलटला नसताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. (MahaKumbh Mela Fire)

मुंबई : श्री देवी भराडी मातेचा जयजयकार ऽऽऽऽ, श्री देवी भराडी माते नमो नम:ऽऽऽऽ असा जयघोष करत लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि ...
महाकुंभ मेळ्यात सेक्टर १८ मधील शंकराचार्य मार्गावरील हरिहरानंद कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास छावणीत दोन ठिकाणी ही घटना घडली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे समोर आले नसले तरीही आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग लागण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र महाकुंभमेळ्यात सातत्याने आगीच्या घटना घडत असल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (MahaKumbh Mela Fire)
#WATCH | Prayagraj | A fire breaks out in Sector 18, Shankaracharya Marg of Maha Kumbh Mela Kshetra. Fire tenders are at the spot. More detail awaited pic.twitter.com/G4hTeXyRd9
— ANI (@ANI) February 7, 2025