मुंबई : श्री देवी भराडी मातेचा जयजयकार ऽऽऽऽ, श्री देवी भराडी माते नमो नम:ऽऽऽऽ असा जयघोष करत लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. (Anganewadi Jatra 2025) प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कोरोनाच्या निर्बंधाखाली होत असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा आता तोंडावर आली आहे. यंदा २२ फेब्रुवारी रोजी जत्रा पार पडणार असून देवीला कौल दाखवून ही तारीख निर्धारित करण्यात आली. दरम्यान, या यात्रेला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वेने यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंगणेवाडीला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुकर होणार आहे.
GBS in Maharashtra : महाराष्ट्रात जीबीएसमुळे ६ मृत्यू, राज्यात जीबीएसचे १७३ रुग्ण
प्रवाशांची वाढती गर्दी आणि आंगणेवाडीच्या दिशेनं जाणारा एकंदर ओघ पाहता या गर्दीचं विभाजन करण्यासाठी म्हणन कोकण रेल्वेकडून आगामी आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. जाणून घ्या कसे असेल वेळापत्रक.
- गाडी क्र. ०११२९ ही विशेष रेल्वेगाडी एलटीटीहून २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. त्यानंतर सावंतवाडी रोड येथे ती दुपारी १२ वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. ०११३० विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोडहून २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटून मुंबई एलटीटीला सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
थांबा : वरील रेल्वेगाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, बोरत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा असेल. तर, या रेल्वेगाडीला एकूण १९ डबे असतील.
- गाडी क्र. ०११३१ एलटीटी येथून २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून, ती सावंतवाडी रोडला दुपारी १२ वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. ०११३२ ही सावंतवाडी रोडवरून २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि एलटीटीला सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
थांबा : २२ डब्यांची ही रेल्वे ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.