महाकुंभ मेळ्यात अभिनेता स्वप्नील जोशीने केलं पवित्र स्नान

प्रयागराज : प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळाव्याला भारतासह जगभरातील भक्तांनी खास हजेरी लावली आहे.अशातच निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने हिंदू धर्मात पवित्र मनाला जाणाऱ्या महाकुंभ मेळ्यात जाऊन पवित्र स्नान करून आशीर्वाद घेतेले आहेत. स्वप्नील हा कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसतो. आता अश्यातच त्याने महाकुंभ मेळाला हजेरी लावून चाहत्यांचे मन जिंकले आहे.


स्वप्नील जोशीने त्याचा सोशल मीडिया वरून या महाकुंभ मेळ्याची खास झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. त्रिवेणी संगम इथे जाऊन स्वप्नीलने खास स्नान केलं आणि भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या खास सोहळ्याची झलक त्याने या व्हिडिओ मधून दाखवली आहे. स्वप्नील हा खास अनुभव शेअर करत म्हणाला "हा माझा २०२५ मधला सगळ्यात अविस्मरणीय अनुभव आहे. महाकुंभ मेळ्यात उपस्थित राहून पवित्र स्नान करण्याचा योग आला खूप सकारात्मक ऊर्जा अनुभवून डोळ्यातून आपसूक आनंदअश्रू आले. या अद्भुत संगमाचे साक्षीदार होणं दैवी आशीर्वाद वाटतो". असे त्याने म्हटले आहे. स्वप्नील कायम चर्चेत राहणारा अभिनेता असला तरी त्याची अध्यात्मिक बाजू देखील तितकीच खास आहे.





स्वप्नील कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसतो आणि अश्यातच चित्रपटाच्या कथे सोबत तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारून त्यांना योग्य तो न्याय देतो. जिलबी, चिकी चिकी बुबूम बुम नंतर स्वप्नील सुशीला - सुजीत, शुभचिंतक या चित्रपटात देखील स्वप्नील जोशी अनोख्या भूमिकेत दिसणार आहे आणि याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Comments
Add Comment

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई:

'फिर से गुड न्यूज' भारती आणि हर्षने खास पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी!

मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि

“तुम्ही संत्री कशी खाता?” : FICCI Frames 2025 मध्ये अक्षय कुमारने फडणवीसांना विचारला गंमतीशीर प्रश्न !

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना

‘प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई  : 'प्रेमाची गोष्ट २' या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला

आलिया भट सोबत कोण दिसणार मुख्य भूमिकेत ? विकी कौशल की रणबीर कपूर ?

लवकरच रणबीर कपूर आणि विकी कौशल एका जबरदस्त सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . येत्या ईद ला संजय लीला