छ. संभाजीनगर : अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक झाले आहेत. अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचा पाहायला मिळतोय. छावा सिनेमाच्या प्रमोशनसाठी सध्या विकी कौशल संभाजीनगर येथे पोहोचला आहे. या शुभकार्याची सुरुवात अभिनेत्याने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यावेळी विकी मंदिरात पूजा करण्यात मग्न असलेला दिसतो आहे.
सोशल मीडियावर विकी कौशलचे व्हायरल होणारे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, येत्या १४ फेब्रुवारीला ‘छावा’ हा सिनेमा जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता देखीस शिगेला पोहचली आहे. अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…