Pariksha Pe Charcha : यंदा ‘परिक्षा पे चर्चा’ सहभागासाठी ३ कोटी ५६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पंतप्रधान मोदींसह दीपिका पदुकोण, मेरी कोम, विक्रांत मेस्सींसह विविध दिग्गज साधणार संवाद

  61

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्डाच्या परीक्षांपूर्वी देशभरातील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमातून संवाद साधतात. गेल्या आठ वर्षांपासून 'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम राबवला जात आहे. त्यांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना करिअरच्या वाटेवर महत्त्वाच्या असणाऱ्या परीक्षेमधील यशासाठी तसेच तणावमुक्त राहण्यासाठी एकंदरीतच अभ्यासाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात.


आता पंतप्रधान मोदींचा 'परीक्षा पे चर्चा' हा संवाद कार्यक्रम यावर्षी नवीन स्वरूपात आणि शैलीत आयोजित केला जात आहे. यावर्षी ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये पंतप्रधान मोदींसह बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, बॉक्सर मेरी कोम, अवनी लेखारा, ऋजुता दिवेकर, सोनाली सभरवाल, फूडफार्मर, विक्रांत मेस्सी, भूमी पेडणेकर, टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता आदी सहभागी होत आहेत. ते विद्यार्थ्यांना टिप्स देतील. २०२५ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी ३ कोटी ५६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.



यंदा साडेतीन कोटी विद्यार्थ्यांची नोंदणी


२०१८ मध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. सातव्या आवृत्तीपेक्षा यंदा होणाऱ्या आठव्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. गेल्या वर्षी यासाठी २.२६ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हा कार्यक्रम पहिली तीन वर्षे नवी दिल्ली येथे टाउन-हॉल इंटरॅक्टिव्ह स्वरूपात आयोजित केला होता. कोरोना काळात चौथा कार्यक्रम दूरदर्शन आणि सर्व प्रमुख टीव्ही चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात ऑनलाइन आयोजित केला होता.



'परीक्षा पे चर्चा'चे यंदाचे आठवे वर्षे


'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचे हे आठवे वर्षे आहे. या वर्षी तीन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे टाउन हॉल स्वरूपात आयोजित केला जातो.

Comments
Add Comment

व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आगामी

हिमाचल प्रदेश : चंबा येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा आणि भरमौर परिसरात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भरमौर परिसर

बिहारच्या ३ लाख मतदारांना निवडणूक आयोगाची नोटीस

परदेशी नागरिक असल्याच्या संशयावरून बाजवली नोटीस पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण

पंतप्रधान मोदींना जपानमध्ये खास भेट म्हणून मिळाली दारुम बाहुली

टोकियो / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शुक्रवारी (दि.२९)

Bihar Election : मोदींवर अपशब्दांचा वर्षाव अन् शाहांचा इशारा..."जितक्या शिव्या द्याल, तितकं कमळ बहरणार!"

बिहार : बिहारमध्ये या वर्षाअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार सुरू केली आहे.

उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसाचा कहर

डेहराडून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. टिहरी जिल्ह्यातील गेंवाली भिलंगना येथे